Breaking News

पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

पुणे, दि. 26, ऑगस्ट - 29 व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता हॉटेल सारस, नेहरु स्टेडिअम येथे विभागीय आयुक्त  चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संपन्न झाली. याप्रसंगी सिनेतारका तेजस्विनी लोणारी, आयली घिया उपस्थित होत्या. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी,  मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. सतीश देसाई, काका धर्मांवत, बाळासाहेब आमराळे, भगवान कडू, अशोक मेमजादे, रविंद्र दुर्वे,  प्रसन्न गोखले, श्रीकांत कांबळे, अनुराधा भारती, तेजश्री अडिगे, सुप्रिया ताम्हाणे, दत्तात्रय पोळेकर, सुहास रानवडे, विनेश परदेशी, तानाजी चव्हाण व कार्यकर्ते  उपस्थित होते. वेदमूर्ती धनंजय घाटे गुरुजी यांनी पौराहित्य केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी व आयली घिया  यांचा सत्कार पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने हॉटेल सारस येथील हॉलची आकर्षक सजावट करण्यात आली  आहे.