Breaking News

एकदंत गणेश मंडळाच्यावतीने स्पर्धा

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - दरवर्षीप्रमाणे यंदाही दातरंगे मळा येथील एकदंत गणेश मंडळाने गणेश चतुर्थीनिमित्त 25 ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत विविध स्पर्धांचे  आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, बादलीत बॉल टाकणे स्पर्धा, स्लो सायक्लिगं स्पर्धा, संगीत खुर्ची  स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धांच्या यशस्विततेसाठी ओंकार बुरगूल, गणेश नागूल, स्वप्निल सग्गम, विनित इराबत्तीन, आकाश सिरसूल,  प्रथमेश चाटला, शंतनु बोडखे, राज सुरम, ऋषिकेश इराबत्तीन, ऋषिकेश सामल, निखिल सग्गम, संतोष चेन्नुर, यश मंचे, राजेश नागूल, गौरव म्याना आदींसह  मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.