Breaking News

शहर वाहतूक शाखेचे नियोजन फक्त कागदावरच

खड्डे ,मंडप व मोकाट जनावरांमुळे सर्वत्र वाहतुकीची कोंडी

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - पोलीस प्रशासन याच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेच्या वतीने गणेश उत्सवाच्या  पार्श्‍वभूमीवर शहरातील वाहतुकीचे नियोजन  जाहीर करण्यात आले. केलेले नियोजन कागदावरच  राहिले आहे. गणेश उत्सव सुरु होण्यापूर्वीच शहरातील खडडये.  टाकलेले नियमबाह्य मंडप, व रस्त्यावर ,रास्ता  दुभाजकाप्रमाणे रस्त्यावर   बसलेली  मोकाट जनावरे  यामुळे गेल्या चार दिवसापासून होत असलेली वाहतुकीची कोडी त्यात अवजड वाहनाची वाहतूक व बेशिस्त  धावणारे रिक्षा चालक  यामुळे वाहतुकीची कोंडीत भर पडली आहे . 
प्रेमदन चौक ते जुने बस स्थानक हे तीन किलोमीटरचेअंतर पार करण्यासाठी दुचाकी वाहनचालकाला अर्धा तासपेक्षा जास्त वेळ लागतो .या रस्त्यावर मोकाट जनावरे  , रस्त्यावर पडलेली खड्डे . मोकाट कुत्रे ; बेशिस्त वाहनचालक याची सर्वात मोठी अडचण ठरत आहे . त्यात कोठेही रिक्षा उभी करून प्रवाशी उतरविले जातात  ,तसेच वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे ,वाहन थांबून बोलणे ,  यामुळेही वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे वाहतूक पोलीस  पालिकेकडे बोट दाखवितात   पालिका पोलिसांकडे ,त्यात त्रास हा पादचारी व दुचाकी व लहान मुलांना जास्त होतो . वाहतूक पोलीस फक्त पावत्या व दंड वसुली करून टार्गेट पूर्ण करण्याच्या  नादात बेशिस्त वाहतुकीकडे दुर्लक्ष करतात .रिक्षा चालक पावतीफडलीका   बेशिस्त वाहतुकीचा परवाना मिळाल्यासारखे धावतात.  त्यामुळे अशा वाहनावर कारवाई  होण्याची गरज आहे .
गेल्या आठ दिवसापासून शहरातील विविध भागात ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर केबल व पाईपलाईनचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे शहरतील  रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.