Breaking News

शेतकर्‍यांसाठी कृषी विभागामार्फत रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिक

योजनेअंतर्गत 11 तालुक्यांची निवड प्रक्रिया पूर्ण । कमी उत्पादकता असणार्‍या तालुक्यांना मोठा दिलासा

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - जिल्ह्यातिल कमी उत्पादकता असणार्‍यां महसुल मंडळामधे कृषि विभागातर्फे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी  मोहिम राबवण्यात येणार  आहे. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रिय अन्न सुरक्षा अभियान भरडधान्य योजनेमधे चालू रब्बी हंगामात ज्वारी पिकाचे प्रात्यक्षिक राबवण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात दुष्काळी परीस्थितिमुळे पिकांचे उत्पादन सरासरी पेक्षा कमी झाले.अशा भागामधे ज्वारी पिक प्रात्यक्षिके कृषिखाते राबवणार आहेत. या प्रात्यक्षिकांसाठी  जिल्ह्यामधून 11 तलुक्यांची निवड केली आहे.निवड झालेल्या गावांमधे कृषि सहाय्यकांमार्फत कमाल पाच प्रात्यक्षिके राबवण्यात येणार आहेत. पिक लागवड ते पिक  कापणि दरम्यान ही प्रात्यक्षिके होतिल.या प्रात्यक्षिकांमधे मृदा तपासणी करणे, शेतकरी समृद्ध करणे, उंबरठा उत्पादन वाढवणे, योग्य बियाणांचि निवड, खतनिवड व  शास्रोक्त पद्धतिने त्यांचा वापर करणे, एकंदरितच पिक उत्पादन वाढवणे हे उद्देश असणार आहेत.
या योजनेविषयी बोलताना श्री.लोणारे म्हणाले सदर योजना अत्यंत पारदर्शी व थेट संपर्कात राहुन राबवणार आहोत.लाभार्थी गावातिल शेतकर्‍यांना या योजनेचा शंभर  टक्के फायदा मिळवुन देऊन अन्नधान्य उत्पादनात सक्षम व सजग करणार आहोत.
 लाभार्थी शेतकर्‍यांना लाभ घेण्यासाठी निकष
* विविध पिकांची उत्पादकता वाढविने हेतु तंत्रज्ञान प्रसाराचे साधन म्हणुन पिक प्रात्यक्षिके शेतकर्‍यांचे शेतावर कृषि विभागामार्फत आयोजीत करण्यात येतात. *  पिक प्रात्यक्षिक सलग 10 हे क्षेत्रावर घेण्याची अंमलबजावणी कृषि सहाय्यक करतील. तसेच प्रत्येक कृषि सहाय्यकाकडे कमाल 5 प्रात्यक्षिक देण्यात येणार आहेत. *  पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिने स्थानिक हवामानानुसार तंत्रज्ञान निश्‍चिती. * एकुण 10 हेक्टर क्षेत्र असणार्‍या शेतकर्‍यांचे समुह/गटामार्फत प्रात्यक्षिकांची  अंमलबजावणी करण्यात येणार आहे व गटातील जे शेतकरी शासनाने ठरवुन दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच  शेतकरी समुहांना लाभार्थी म्हणुन निवडण्यात येईल. * लाभार्थी गटाची लॉटरी मिान 10 शेतकर्‍यांचा समावेश असणे बंधनकारक.* लाभार्थी शेतकर्‍याला योजनेच्या  मार्गदर्शक सुचनेप्रमाणे अनुज्ञेय असणार्‍या क्षेत्र मर्यादेपर्यंत आर्थिक लाभ देण्या येणार आहे. शास्त्रोक्त पध्दतीने पिक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे आदी.
पिक कापणी प्रयोगासाठी निवड करण्यात आलेल्या गावांमधिल लाभार्थी शेतकरी गटाने या संबंधिचा अर्ज व 7/12 उतारा  संबंधित कृषिसहाय्यकांकडे द्यावेत असे  आवाहन कृषि खात्यामार्फत करण्यात  आले आहे.