Breaking News

गणपती रांगोळी स्पर्धा या नवोदीत कलाकारांना प्रोत्साहन देणार्‍या - नगराध्यक्षा अनुराधा आदिक

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - इनरव्हिल क्लब श्रीरामपूरचे काम उल्लेखणीय, शहरात होणार्‍या विविध सामाजिक कार्यात हा क्लब आवर्जुन सहभाग घेतो. क्लबने  घेतलेल्या गणपती रांगोळी स्पर्धा या नवोदीत कलाकारांना प्रोत्साहन देणार्‍या ठरणार आहेत असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले.
इनरव्हिल क्लबच्यावतीने टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात आयोजित रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते झाले. यावेळी  त्या बोलत होत्या. या स्पर्धेत 50 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. क्लबच्या अध्यक्षा डॉ.सौ. ज्योत्सना तांबे ,माजी आध्यक्षा सौ.प्रिया अग्रवाल ,सौ.रमा  फोफळे,श्रीमती मंगला आढाव, सेक्रटरी सौ.ममता गुप्ता ,सौ. शर्मिला पांडे, यांच्यासह क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रथम क्रमांकाचे 1 हजार रुपयांचे बक्षीस पुजा जाजु, द्वितीय 750 रुपयांचे बक्षीस प्रतिका बिरारी तर तृतीय क्रमांकाचे 500 रुपयांचे बक्षीस सोनाली बाबलु  यांना मिळाले. उत्तेजनार्थ अंजु भंडारी, प्राजक्ता मुळे, गितांजली बंग, वैशाली न्याती यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी अध्यक्षा सौ. प्रिया अग्रवाल यांनी केले. तर आभार सेके्रटरी सौ. वृंदा देशपांडे यांनी मानले. तर उपस्थित प्रेक्षकांसाठी श्रीमती सुजाता  शेडगे व श्रीमती वर्षा जोशी यांनी विविध स्पर्धा घेतल्या.