Breaking News

मुलींनी हस्त कलेतून साकारल्या गणपतीच्या मूर्त्या

सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या वतीने उपक्रम

अहमदनगर, दि. 25, ऑगस्ट - गणपती बनवा या कार्यशाळेच्या उपक्रमा अंतर्गत नेवासा येथील सुंदरबाई कन्या विदयालयाच्या वतीने आपला आपला गणपती  आपण बनवाहा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेतील मुलींनी आपल्या हस्ते कलेद्वारे आगळया वेगळया पध्दतीने गणेश मूर्ती साकारल्या.
सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या रंजना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेमध्ये मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.पर्यावरणपूरक  इको फ्रेंडली गणपती आपणच बनवा या उपक्रमामुळे मुलींच्या कलागुणांना वाव मिळाला.हा उपक्रम कलाशिक्षिका सुजाता गोरे,प्रशांत पटेकर,सूर्यभान उघडे यांच्या  नेतृत्वाखाली राबविण्यात आले.
या उपक्रमाचे प्राचार्या रंजना देशमुख, ज्ञानोदयचे मुख्याध्यापक पंडितराव खाटीक,पर्यवेक्षक प्रदीप काळे,अध्यापिका स्मिता पानसरे,श्रीमती राऊत,श्रीमती  पारखे,अध्यापक श्री.चव्हाण, श्री भताने,श्री महाजन,श्री पवार,श्री आदमने सर यांनी मुलींच्या या कलागुणांचे कौतुक करून अभिनंदन केले.