Breaking News

डोकलाम येथे रामनाथ हाके या लातूरच्या जवानाला वीरमरण

लातूर, दि. 27, ऑगस्ट - सध्या भारत-चीन या दोन देशात ज्या डोकलाम मुद्द्यामुळे संबंध ताणले आहेत. त्याच डोकलाम येथे बीएसएफचे तांत्रिक अभियंता  म्हणून कर्तव्य बजावीत असताना रामनाथ महादेव हाके या जवानाला वीरमरण आले. ते लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील मष्णेरवाडी येथील होते.
पश्‍चिम बंगाल मधील सिलिगुडी येथे हाके कार्यरत होते. मात्र डोकलाम येथे 18 हजार फूट उंचीवर कर्तव्य बजावीत असताना मेंदूत अतिरक्तस्त्राव अर्थात ब्रेन  हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मशनेरवाडीसह लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. आज रविवारी रामनाथ महादेव हाके यांच्यावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.