लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित अखेर 9 वर्षांनी कारागृहाबाहेर
मुंबई, दि. 23, ऑगस्ट - 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित 9 वर्षांनी आज अखेर कारागृहाबाहेर आले. तळोजा कारागृहाबाहेर येताच त्यांना लष्कराच्या पुढील कार्यवाहीसाठी कुलाबा (मुंबई) येथील कार्यालयात नेण्यात आले.
तेथील प्रक्रिया पार पाडल्यानंतर कर्नल पुरोहित हे पुण्याला रवाना होणार असल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले. पुरोहित हे आज तळोजा कारागृहाबाहेर येणार हे काल रात्रीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी व छायाचित्रकारांनी कारागृहाबाहेर एकच गर्दी केली होती. कर्नल पुरोहित यांचे लष्करातील काही सहकारीही या वेळी कारागृहाबाहेर उपस्थित होते. पुरोहित यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता कडक सुरक्षाव्यवस्थेत रवाना झाले.