बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातून 5 गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त
कल्याण, दि. 16, ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात 5 गावठी पिस्तुल, 28 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यामध्ये तीन जणांना ताब्यात आले असून 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बदलापूर स्थानक परिसरात एका इनोव्हा गाडीतून काही व्यक्ती बदलापूर गावात शस्त्रांसह येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. अधिक तपासात एकूण 5 गावठी पिस्तुल, 28 जिवंत काडतुसांसह एक इनोव्हा गाडी जप्त करण्यात आली, अशी माहिती विरोधी ठाणे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कानडे यांनी दिली. या तिघांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय (ठाणे) यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
प्राथमिक चौकशीत बदलापूर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी ही शस्त्रास्त्रे आणल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले.