श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 40 किलोंचे दागिने!
पुणे, दि. 23, ऑगस्ट - पुण्याचे लाडके दैवत म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. यंदा सार्वजनिक गणेश उत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त नवीन दागिने तयार करण्यात आले आहेत. थोडे थोडके नव्हे तर तब्बल 40 किलो सोन्याचे दागिने बाप्पासाठी तयार करण्यात आले आहेत. यामध्ये आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह 8 ते 10 हजार खडयांची सजावट असलेला साडेनऊ किलोचा मुकुट बाप्पासाठी साकारण्यात आला आहे.
रत्नजडित खडयांनी नटविलेला 700 ग्रॅमचा शुंडहार, सूर्याच्या किरणांचा आभास निर्माण करणारे 2 किलोचे कान, तब्बल 4 हजार सुवर्ण टिकल्यांनी मणीकाम करुन चंद्रकोराची आभास निर्मिती करणारा अडीच किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. कपडयावर खडेकाम असलेले साडेतीन किलोचे उपरणे, साडेसहा किलोचे सोवळे, पांढर्या खडयांचे कोंदण असलेला एक किलोचा हार असे दागिने साकारले आहेत. कपडयावर प्रथमच अशा प्रकारचे काम करण्यात आले आहे. पु.ना.गाडगीळ यांच्या महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक येथील निष्णात 40 कारागीर गेल्या 5 महिन्यांपासून कार्यरत आहेत. या सोन्याची अंदाजे किंमत पंधरा कोटी रुपये आहे.