उमराणे येथे कांदा व्यापा-याची 31 लाखांची फसवणूक
देवळा, दि. 23, ऑगस्ट - तालुक्यातील उमराणे येथील कांदा व्यापा-याची सुमारे 31 लाख 36 हजार 995 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देवळा पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील उमराणे येथील कांदा व्यापारी अनिल दादाजी देवरे यांच्याकडून पुरुषोत्तम महाले, रा. पिंपळगाव तसेच अंकीत व योगेश गोराडे दोन्ही रा.सानपाडा मुंबई यांनी अनिल देवरे यांचा विश्वास संपादन करुन पाच ट्रक क्र.एम.एच.15 -ई.जी. 4881, एम.एच.15 - ई.जी. 4882 , एम.एच. 14 - सी.पी.- 2897 , एम.एच.-15-7308, एम.एच.-15-ई.जी.-6390मधुन सुमारे 120 टन कांदा कींमत 31 लाख 36 हजार 995 रुपयेचा घेतला व माल पोहोच झाल्यावर पैसे पाठवतो असे सांगितले. मात्र सदर कांदा त्यांनी परस्पर कोणालातरी विकून फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील करत आहेत.