Breaking News

बिंदुसरा धरण तुडंब भरल्याने प्रशासन सतर्क; भिंत पडल्याने 26 मेंढया दगावल्या


बीड, दि.30 ः सोमवारी रात्री अंबाजोगाई, नेकनूर, धीड परिंगला पाऊस झाल्याने बीड शहरातील बिंदुसरा मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून पाण्याची आवक चालु असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल आहे.नदी परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. दरम्यान सततच्या पावसामुळे शहरातील व आसपासच्या गावांतही पडझड वाढली असून आज दुपारी आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथे भिंत पडून 26 शेळ्यांचा मृत्यू झाला.रविवारी बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोदा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मांजरसुंबा, अंमढळनेर,थेरला,धामणगाव नेकनूरसह बालाघाटावरील पावसाचे पाणी विंदुसरानदीला मिळते. या गावांत चांगला पाउस झाला या मुळे बिंदुसरा नदीला पाणी मोठया प्रमाणात आले असून बीडनजीकचे धरण तुडूंब भरले आहे.