Breaking News

पिंपरी-चिंचवडमध्ये 26 घाटांवर होणार विसर्जन

पिंपरी चिंचवड, दि. 26, ऑगस्ट - गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले आहे. मात्र दीड दिवसांच्या गणपतींना निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड  येथील 26 विसर्जन घाटांवर अग्निशामक दल व पोलीस दलाचे दोन हजार जवान तैनात केले जाणार आहेत. पिंपरी- चिंचवड येथील पिंपरी, काळेवाडी, थेरगाव,  सांगवी, वाल्हेकरवाडी, मोशी अशा 26 घाटांवार विसर्जनाला सुरुवात होणार आहे. यामध्ये दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा व दहा दिवसाच्या  गणपतींचे विसर्जन करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. यावेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशामक दल व पोलीस दल सज्ज झाले आहे. 26  घाटावर अग्निशामक दलाचे एकूण 65 कर्मचारी तैनात असणार आहेत. यामध्ये घाटावर कमीत कमी दोन जास्तीत-जास्त चार कर्मचारी असणार आहेत. तसेच क्रीडा  विभागाचे जीवन रक्षक, सुरक्षा विभागाचे कर्मचारी तसेच काही स्वयंसेवी संस्थाही यावेळी सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करणार आहेत. यावेळी बोट, लाईफ जॅकेट, लाईफ  रोप यांचाही वापर गरजेनुसार केला जाणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता नदीपात्रातही पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे डोळ्यात तेल घालून यंत्रणेला काम  करावे लागणार आहे.