Breaking News

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रविवारी सोलापुरात

सोलापूर, दि. 26, ऑगस्ट - माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील 27 ऑगस्ट रोजी सोलापुरात येत आहेत. शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वोरोनोको प्रशाला येथे  रविवारी दुपारी तीन वाजता आयोजित माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारोप कार्यक्रमास त्या  उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2.30 वाजता पुणे येथून सोलापूरला रेल्वेने येतील. सायंकाळी 7.50 वाजता रेल्वेने पुण्याकडे रवाना होतील.