Breaking News

सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 5.7 टक्क्यांवर घसरला; तीन वर्षांतील नीचाकी स्तर

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - चालू आर्थिक वर्षात जून महिन्यात संपलेल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नात घसरण झाली आहे. 2016-17 च्या चौथ्या  तिमाहीत 6.1 टक्के होते. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 7.9 टक्के एवढा होता. आता घसरण होऊन 5.7 टक्क्यांवर पोचले आहे. हा दर गेल्या तीन वर्षांतील  नीचांकी स्तर आहे.
सकल राष्ट्रीय उत्पन्नातील घसरण चिंतेचा विषय असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. पुढील तिमाहीत हा दर आणखी चांगला असेल अशी  आशा व्यक्त केली जात आहे.
चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्नात 5.7 टक्के दराबरोबर 31.10 लाख कोटी रुपये राहिला, असे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जाहीर  करण्यात आली आहे. उत्पादन व बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे नोटा रद्दच्या निर्णयानंतर सलग तिस-या तिमाहीत परिणाम कायम आहे.