राज्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी 23 सप्टेंबरला मतदान
मुंबई, दि. 22, ऑगस्ट - विविध जिल्ह्यातील ऑक्टोबर 2017 मध्ये मुदत संपणार्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 114 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 सप्टेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी याबाबत घोषणा केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांसाठी 4 ते 8 सप्टेंबर 2017 या कालावधीत सुट्टीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
13 सप्टेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल. 23 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मात्र दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी 25 सप्टेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.