शालेय पोषण आहार त्वरित सुरु करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
नाशिक, दि. 02 - आंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार त्वरित सचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना दिले. शासनाने कुपोषित मुलांना पोषक आहार मिळावा व मुल सुदृढ बनावे याकरिता शालेय पोषण आहार हि सुविधा आंगणवाडीच्या माध्यमातु सुरु केली आहे. नाशिक महापलिका अंतर्गत एकूण 200 आंगणवाड्या आहेत. या आंगणवाड्या शक्यतो झोपडपट्टी भागात असून येथे गोर-गरीब विद्यार्थी येत असतात. या गोर-गरीब विद्यार्थ्यांना नाशिक महापालिकेमार्फत रोज शालेय पोषण आहार मिळतो ज्यामध्ये गुळ, शेंगदाणा लाडू, केळी, चिकू, लापशी, मटकीची हुसळ, राजगिरा लाडू इत्यादी पोषक आहाराचा समावेश असतोालिकेच्या आंगणवाड्या जून महिन्यात सूरु होत असते व विद्यार्थ्यांची लगबग चालू होते या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळणे गरजेचे असताना जून महिना संपला तरी अद्यापही शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने नाशिक महापालिकेच्या आयुक्तांना हे निवेदन देऊन लवकरात लवकर शालेय पोषण आहार सुरु करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेविका कविता कर्डक, अंबादास खैरे, नंदा वाजे, गायत्री मुर्तडक, आशा धोंगडे, लीलाबाई निमसेशोभा गोडसे आदि महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
