Breaking News

’घर बचाओ संघर्ष समिती’च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन

पिंपरी, दि. 02 - प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी तसेच आपल्या हक्काची घरे वाचवण्यासाठी घर बचाओ संघर्ष समितीच्या वतीने महिला मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये थेरगाव, बिजली नगर, पिंपळे गुरव, निगडी, काळेवाडी येथील महिला सहभागी झाल्या.प्राधिकरण येथील रिंगरोडच्या कामासाठी  प्राधिकरण कार्यालयाकडून नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. थेरगाव येथील धनगर बाबा मंदिरात मेळावा पार पडला. मेळाव्यात प्रशासन करत असलेल्या  कारवाईबाबत जाब विचारण्यात आला. रिंगरोडला पर्यायी रस्ता असताना देखील सर्वसामान्यांच्या घरावर प्रशासन का कारवाई करीत आहे ? मागील 30-40  वर्षांपासून इथे राहत असलेल्या नागरिकांनी आता जायचे कुठे ? अशा प्रकारचे सवाल प्रशासनासमोर मेळाव्यात उभे करण्यात आले.रिंगरोडच्या कामात ज्या  नागरिकांची घरे जात आहेत, त्या नागरिकांना ती घरे त्यांच्या नावावर करून द्यावीत, प्रशासनाचा कालबाह्य झालेला डीपी तात्काळ रद्द करावा तसेच नागरिकांना  त्यांच्या हक्काची घरे द्यावी, अशा प्रकारच्या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. प्राधिकरण प्रशासनाने मागण्या मान्य न करता कारवाई केली तर नागरिकांच्या व घर  बचाओ संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.