Breaking News

घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडर 61.50 रुपयांनी स्वस्त ?

नवी दिल्ली, 01 - घरगुती वापरावयाचा गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, हा विनाअनुदानित सिलिंडर असून 61.50 रुपयांनी तो स्वस्त होणार आहे.
तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिल्लीत एक मार्चपासून विनाअनुदानित 14.2 किलोग्रॅमचा घरगुती गॅस सिलिंडर 575 रुपयांऐवजी आता 513.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात 118 रुपयांची घट करण्यात आली होती. तर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात 9 पैसेनी घट करण्यात आली होती. तसेच याआधी पेट्रोल किंमतीत 3.02 रुपयांनी घट करण्यात आली. तर डिझेलमध्ये 1.47 रुपयांनी वाढ करण्यात आली.