Breaking News

पंढरपूरच्या मंदिर समितीच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड

पंढरपूर, दि. 02 - पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या अध्यक्षपदी ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड करण्यात आली आहे. उच्च  न्यायालयाने समितीची नियुक्ती करण्याबाबत राज्य सरकारला आदेश दिले होते. औसेकर महाराज हे मूळ औसा (जि. लातुर)चे आहेत. 2001 ते 2005 या काळात  ते मंदीर समितीवर सदस्य म्हणून होते. काल रात्री दिर्घ चर्चेनंतर औसेकर महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदाच्या शर्यतीत बाबा महाराज  सातारकर, विश्‍वनाथ कराड आदी नावे चर्चेत होती. मात्र पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शिफारशीमुळे औसेकर महाराजांच्या पारड्यात हे पद पडल्याची चर्चा  आहे. अध्यक्ष निवडीनंतर आता सदस्य निवडीची उत्सुकता भाविकांमध्ये आहे. या निवडीमुळे मंदीर समितीच्या कामानां वेग येणार आहे.