पाणी पुरवठा योजनेच्या नुतनीकरणासाठी निधी देण्याची पंकज भुजबळ यांची मागणी
नांदगांव, दि. 21, जुलै - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रमाअंतर्गत प्रगतीपथावरील योजनांसाठी मंजूर योजनेच्या किंमतीवर केंद्र शासनाचा हिस्सा 50% व राज्य शासनाचा हिस्सा 50% यानुसार अनुदान प्राप्त होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या वा नवीन राबविण्यात येणा-या व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत एनआरडीडब्ल्यूपी समाविष्ट असलेल्या योजनांसाठी राज्य शासनामार्फत घ्यावयाच्या अनुदानाची जिल्हा नियोजन/ डीपीसी कृती आराखडा सन 2017-18 मधून निधी उपलब्ध करून घेण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत. दि. 2 जून 2017 रोजी प्रधान सचिु. व स्व. विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पेयजल कृती आराखडा सन 2017-18 अंतिम करण्याच्या अनुषंगाने एसएलएसएससीची 26 वी बैठक संपन्न झाली आहे. त्या बैठकीत नांदगांव व 56 खेडी पाणी पुरवठा योजनेचे (नांदगांव/मालेगांव/देवळा) नुतनीकरनासाठी या योजनेचा कृती आराखड्यात समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
सदर योजनेसाठी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे वेळोवेळी लेखी पत्रांद्वारे मागणी केली होती. विधानसभेच्या जी.एस.टी. संदर्भातील अधिवेशनाच्या काळात आमदार पंकज भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेवून लेखी निवेदनाद्वारे 56 खेडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या नुतनीकरणाच्या कामाबाबतची मागणी केली होती. तसेच विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न देखील उपस्थित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदगांव तालुका तर्फे नांदगांव व 56 खेडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे नुतनीकरण होण्यासाठी आंदोलन देखील केले होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच या योजनेत समाविष्ट असलेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक व संबंधित पदाधिका-यांची लवकरच बैठक आमदार पंकज भुजबळ यांच्या समवेत घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये योजनेबाबत सखोल चर्चा करून नवीन पुर्नजीवन योजनेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर आमदार पंकज यांनी जिल्हा नियोजन बैठकीत आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत मालेगांव, नांदगांव, येवलाच्या आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांच्या विकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीकोनातून नांदगांव येथे कळवण प्रकल्प कार्यालयाचे उपकार्यालय व्हावे अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी केली. तसेच नांदगाव मालेगाव येथील आदिवासी बांधवाना कळवण तर येवला येथील नागरिकांना नाशिक येथे योजनांचा लाभ घेण्यासाठी जाण्याची गरज राहणार नसून त्यांना नांदगाव येथेच सुविधा मिळू शकतील असे त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
तसेच चांदवड, मनमाड, नांदगांव राज्य मार्ग क्र. 24 हा रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सातत्याने अपघात होवून अपघातात अनेक जन मृत्यू मुखी पडलेले आहेत. अपघात टाळण्याच्या दृष्टीकोनातून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी व रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी बैठकीमध्ये केलेली आहे.