Breaking News

ब्राव्हो : सचिन - कोहलीलाही जे जमलं नाही ते हरमनप्रीतनं करून दाखवलं!

नवी दिल्ली, दि. 21, जुलै - महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत टीम इंडियानं फायनलमध्ये जागा मिळवलीय. या विजयाचा शिल्पकार  ठरलेल्या हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला वनडेची सर्वश्रेष्ठ खेळी खेळली. हरमनप्रीतनं 115 बॉल्समध्ये 20 चौकार आणि सात सिक्सर ठोकत नाबाद 171 रन्स  केले. यासोबतच कौरनं आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड कायम केलेत. खास गोष्ट म्हणजे, तिनं अनेक पुरुष खेळाडुंनाही या रेकॉर्डमध्ये मागे सोडलंय. जो रेकॉर्ड सचिन,  धोनी आणि विराटही बनवू शकले नाहीत तो हरमनप्रीत कौरनं आपल्या नावावर केला.
आयसीसी वर्ल्डकपच्या नॉकआऊट स्टेजमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याच्या बाबतीत हरमनप्रीतनं भारताच्या पुरुष खेळाडुंनाही मागे टाकलंय. आयसीसी पुरुष  वर्ल्डकपमध्ये नॉक आऊट स्टेजमध्ये भारताकडून सर्वात जास्त रन्स बनवण्याचा रेकॉर्ड रोहीत शर्माच्या नावावर आहे. त्यानं 19 मार्च 2015 ला बांग्लादेशच्याविरुद्ध  क्वॉर्टर फायनल मॅच खेळताना 137 रन्स करून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. परंतु, हरमनप्रीतनं 171 रन्स बनवून रोहीतलाही मागे टाकलंय.
आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये नॉक आऊट स्टेजमध्ये सर्वात जास्त व्यक्तीगत रन्स बनवणारी हरमनप्रीत ही पहिली खेळाडू ठरलीय. यापूर्वी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या  कारे रोल्टोनच्या नावावर होता. रोल्टॉननं हा रेकॉर्ड 2005 मध्ये महिला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध 107 रन्स ठोकत कायम केला होता. तब्बल 12  वर्षानंतर हरमनप्रीतनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.