Breaking News

अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत तालिबानचा म्होरक्या ठार

काबुल, दि. 21, जुलै - अफगाणिस्तानमधील बदख्शान प्रांतात सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. यामध्ये तालिबानचा  म्होरक्या मुल्ला नुरूल्ला हाही ठार झाला असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना तालिबानच्या तळांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी केलेल्या कारवाईत  तीन दहशतवादी ठार झाले.
मुल्ला नुरूल्ला हा बदख्शान प्रांतातील प्रमुख दहशतवादी होता. येथील दोन महिला पोलीस अधिका-यांची हत्येमागे त्याचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.