Breaking News

अत्याचाराला विरोध करणा-या मुलीचा खून करणा-यास पोलीस कोठडी

औरंगाबाद, दि. 21, जुलै - हनुमंतखेडा ता.सोयगाव येथील सीमा राठोड (वय 15) हिने लैंगिक अत्याचारास विरोध केल्याने गावातील चार जणांनी तिच्याच  ओढणीने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केल्याची बाब पोलीस तपासात ही बाब पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीस न्यायालयाने येत्या  सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचेआदेश दिले आहेत. 
सीमा राठोड सायंकाळी शाळेतून घरी आल्यावर स्वयंपाकाला पाणी नसल्याने गावापासून एक किलोमिटरवर असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात होती.  रस्त्यात मुश्ताक शेख याचे शेत व गुरांचा गोठा आहे. गोठयाजवळ मोठा हौद व जवळच नळ आहे. सीमा या नळावर हंडा भरण्यासाठी आली. याचवेळी मुश्ताक शेख  (22), भुरा बालू पवार (21), पवन माधन चोतमल (17), नानू जानसिंग राठोड (21) हे त्याठिकाणी बसले होते. सीमाला पाहताच मुश्ताकने तिला उचलून  गोठयात उचलून नेले व अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सीमाने याला विरोध करताच तिचे डोके जमीनीवर आपटून व डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात  आला. या चारही आरोपींनी या मुलीचा मृतदेह त्याच मध्यरात्री जीपमध्ये टाकून दरीन नेवून टाकला मात्र तो झाडाला अडकून राहिल्याने दुसर्या दिवशी गुराखांना  दिसला. त्यांनी पोलिसात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी शोध घेवून आरोपींना अटक केली. मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने सोमवार दि.  24 पर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.