कोचिंग क्लासेस संचालकांकडून आर्थिक लूट
जळगांव जामोद,(प्रतिनिधी), दि. 25 - तालुक्यासह शहरांमध्ये विनापरवानगी खाजगी शिकवणी मोठ्या प्रमाणात सुरु असून विद्यार्थी व पालकांची सर्रास आर्थिक पिळवणूक होत आहे. शाळेमधील वर्गात शिकवणी चांगल्या प्रकारची नसल्याने विद्यार्थ्यांचा कल कोचिंग क्लासेसकडे वाढला आहे. आपल्याला शिकायचे तो विविध नोकरीबाबत स्वप्न पाहत असतो. मात्र कोचिंग क्लासेस संचालक विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी घेऊन एक प्रकारे गोरखधंदा सुरु करुन लाखो रुपये कमाई करुन गोरगरिब,कष्ठकरी, शेतकरी, होतकरु पाल्यांकडून वसूली करुन लुटण्याचे काम विनापरवानगी संचालक शिक्षक करित आहेत. याकडे गटशिक्षण अधिकार्यांचे दुर्लक्ष म्हणावे की, स्वार्थ हे कळायला मार्ग नाही.
जळगांव शहरामध्ये काही अंतरावर कोचिंग क्लासेस आहेत. क्लासेसमध्ये वर्ग 1 ते 5 पर्यंत एका विषयाची फी 2 हजाराहून अधिक आहे. 5 ते 12 वी पर्यंतची फी दहा ते पंधरा हजार रुपये आहे. फी आकारणी अधिकार कुठलाही संमत नाही, संचालक शिक्षक पाल्यांकडून अव्वाच्या सव्वा पैसा घेवून गब्बर झाले. क्लासेस बिना परवानगी चालत असल्याची माहिती गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी यांना माहिती असतांना कार्यवाही का केली जात नाही विद्यार्थ्यांची मानसिकता खाजगी शिकवनीकडे का आहे? शासन करोडो रुपये खर्च करुन शाळा, विद्यालय उभे करुन हजारो रुपये पगार घेणारे शिक्षक त्या शाळेवर नेमुन सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळत नसल्याने आज गोरखधंदा करणारे क्लासेस चालकमालक यांच्याकडे विद्यार्थी जात आहे. कोचिंग संचालक यांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी नविन फंडा शहरात गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो व गुण पॉम्प्लेट वृत्तपत्राच्या मध्यमातून हजारो रुपये खर्च करुन, जाहिरात देतात व शहरांच्या मुख्य रस्त्यावर चौकाचौकातून विद्यार्थी ये जा करतात. त्या ठिकाणी आपल्या क्लासेसचे बॅनर लावतात. या गंभीर बाबींकडे प्रशासन का लक्ष देत नाही? गटशिक्षण अधिकारी यांचे काही साटेलोटे असल्याचे एका खाजगी संचालक क्लासेसच्या शिक्षकाने सांगितले आहे. खाजगी शाळांमध्ये गरिब विद्यार्थ्यांना शिक्षण का मिळत नाही? कारण त्यांच्याकडे पैसा नाही? खाजगी शाळा व्यवस्थापक वर्गामध्ये नाव टाकण्यासाठी 2 हजार रुपये, पाचवीमध्ये 3 हजार रुपये, 8 वीमध्ये 4 हजार रुपये 11 वीमध्ये 5 हजार रुपये आणि वर्षभर संचालक मंडळ आणखी फी आकारणी करेल ती वेगळी. त्यामध्ये विद्यार्थी प्रवेश 100 टक्के 9 ते 12 वर्गापर्यंत मात्र जातनिहाय प्रवेश स्थानिक शिक्षण मंडळ द्वारा चालवित असलेल्या कॉलेजमध्ये घेतल्या जाते आणि 4 थ्या 8व्या 11 वी व 12 वी सदर संस्थासंचालक नियमबाह्य विद्यार्थी पालकांकडून लुटून त्यांना पावतीसुद्धा देत नाही. पावती कोणी मागितली तर त्यांना शाळेमधून काढून टाकण्याची धमकी दिल्या जाते. लाखो रुपये दरवर्षी जमा केला जातो परंतु तो पैसा जातो कुठे? शिक्षक, शिपाई, आदी कर्मचार्यांचे पगार शासन महिन्यापोटी देतो मग संचालक या पैशाचे करतो तरी काय? शाळा इमारत निधी सुद्धा शासन स्तरातून उपलब्ध होतो. चोर चोरी कितीही करणार आखरी जाळ्यात तर गुंतणारच अशा जळगांव जामोद तालुक्यातील विविध संस्था व प्रशासनाने लक्ष देवून विद्यार्थी, पालकांची लुट थांबवून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी पालकवर्ग करित आहे.