नाझींची पेन्शन बंद करण्याची मागणी
बर्लिन, दि. 10 - बेल्जियममधील मंत्र्यांनी तेथे राहात असलेल्या नाझींना जर्मन सरकारकडून मिळत असलेली पेन्शन बंद करावी अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जागतिक युद्धात लक्षावधी निरपराध नागरिकांना यमसदनास पाठविणार्या नाझींमधील सुमारे 2500 जण बेल्जिमयमध्ये राहात असून त्यांना जर्मन सरकारकडून दरमहा पेन्शन दिले जात आहे. नाझींच्या संहारातून वाचलेल्या बेल्जियम वासियांनी अशी पेन्शन देण्यास विरोध
केला असून ही पेन्शन त्वरीत बंद करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे बेल्जियमचे मंत्री डॅनियल बेक्वेलेन यांनीही नागरिकांच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे.
बेल्जियमला नाझींच्या तावडीतून 1945 साली मुक्ती मिळाली होती. त्यावेळी नाझींना मदत करणार्या बेल्जियममधील 57 हजार जणांना शिक्षा दिल्या गेल्या होत्या. विशेष म्हणजे बेल्जियममध्ये आश्रय घेतलेल्या या नाझींना जर्मन सरकार पेन्शन देते आहे. अशा नक्की किती जणांना पेन्शन मिळते याची खरी आकडेवारीही उपलब्ध झालेली नाही. या संदर्भात पेन्शन मंत्री अन्य मंत्र्याबरोबर बैठक करणार असल्याचेही समजते.