आढळा निम्मे भरले; लाभधारकांच्या आशा पल्लवीत
अकोले, दि. 24 - तालुक्यातील देवठाण येथील 1060 दलघफू क्षमतेचे आढळा धरण निम्मे भरले असून लाभधारकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.ॅ धरणात आज 640 दलघफू पाणीसाठा असून धरणात पाण्याची आवक जोरात सुरु आहे. पावसाचा वेग असाच सुरु राहिल्यास धरण लवकरच भरण्याची चिन्हे दिसत आहेत.
आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस धुव्वाँधार असल्याने परिसरातील भातशेतीची कामे जोरात सुरु असून आवणीची कामे चालू आहेत. खरीपाच्या पिकांना जोरदार झालेल्या पावसाने चांगले जीवदान मिळाल्याने पिके सध्या जोमात असून शेतकरी मात्र सुखावला असून धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने लाभधारक शेतकरी ही सध्या तरी समाधानी झाले आहेत. धरण पुर्ण क्षमतेने भरल्यास एकूण परिसरातील सोळा गावांना याचा लाभ होतो. अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, हिरवरगाव, गणोरे, डोंगरगाव, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग, राजापूर, चिकणी, निमगाव भोजापूर, पिंपळगाव कोंझिरा, धांदरफळ, सिन्नर तालुक्यातील कासारवाडी, नळवाडी, या गावांना लाभ होतो.