Breaking News

आत्महत्याग्रस्त शेतक-यांसाठी पोलीस निरीक्षकाचा एका महिन्याचा पुर्ण पगार

नांदेड, दि. 21, जुलै - राज्य शासनाने सर्व शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना आपल्या मासिक वेतनातील एक दिवसाचे वेतन आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या  कुटुंबियांना देण्यासाठी देण्याचे आवाहन केले असताना विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी जुलै महिन्याचा आपला पूर्ण पगार  आत्महत्याग्रस्त शेतक-यांना देण्यासाठीचे पत्र पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
दि.11 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये राज्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना आपले एक दिवसाचे वेतन देणगी म्हणून मुख्यमंत्री  सहाय्यता निधीला देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासंदर्भाने जिल्ह्यातील सर्व घटक प्रमुखांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचा-यांना तसे एक दिवसाचे वेतन  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे आवाहन केले. नांदेडमध्ये पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रभारी असलेले सहायक पोलीस निरीक्षक  ओमकांत चिंचोलकर यांनी 20 जुलै 2017 रोजी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिले असून, माझे जुलै महिन्याचे पूर्ण मुळ वेतन अधिक ग्रेड वेतन अधिक  महागाई भत्ता असे एकूण एका महिन्याचे संपूर्ण वेतन महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्या शेतक-यांच्या कुटुंबियांना  थोडासा हातभार लागावा म्हणून आपण माहे जुलै महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे त्या पत्रात नमुद केले आहे.
मागे जानापुरी गावातील सैनिक कदम हे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते त्यावेळी नांदेडच्या सर्व शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी आपले  एक दिवसाचे वेतन शहीद कदम यांच्या कुटुंबियांना दिले होते. त्याहीवेळेस ओमकांत चिंचोलकर यांनी आपल्या एक महिन्याचे वेतन शहीद कदम यांच्या कुटुंबियांना  दिले होते.