लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
पुणे, दि. 02 - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार नराधमाने केला. ही घटना शिक्रापूर तालुक्यात घडली असून अतुल काजळीकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अतुल काजळीकर ( वय 25 वर्षे रा. शिक्रापूर, ता. शिरूर मूळ रा. आडगाव, ता. मोशी, जि. अमरावती) याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेबरोबर शारीरिक संबंध ठेवले. पीडित तरुणीवर अतुलने जानेवारी 2016 पासून ते 29 जून 2017 पर्यंत शिक्रापूर येथे अत्याचार केले. ही तरुणी 2 वेळा गरोदर राहिली असता, त्याने पीडितेचा गर्भपात केला.
फसवणूक करण्यात आल्याने पीडित तरुणीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी अतुलविरोधात बलात्कार व फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.यानंतर आरोपी अतुल फरार झाला आहे. शिक्रापूर पोलिसांनी आरोपी अतुलविरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल भोसले करीत आहेत.