संस्कृतच्या शिक्षकांनी प्रमाणभाषेचा आग्रह धरावा- डॉ. मालपाणी
संगमनेर, दि. 24 (प्रतिनिधी) :-आजकाल उपस्थित केल्या जाणार्या बोलीभाषा व प्रमाणभाषेसंदर्भातील वादात संस्कृत शिक्षकांनी प्रमाणभाषेचा पुरस्कार केला पाहिजे व त्यासाठी आग्रह धरला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
संगमनेर महाविद्यालयातील संस्कृत भाषा विभाग व संस्कृत संवर्धन मंडळातर्फे इयत्ता आठवी व नववीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात संस्कृत भाषा शिक्षकांसाठी राज्यस्तरीय कृतिसत्राचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संपादक सदस्य डॉ. माधव भुस्कुटे, प्राचार्य डॉ. के. के.देशमुख, माजी संस्कृत विभागप्रमुख डॉ. रुपाली कापरे, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. अनिरुध्द मंडलिक, प्रा. योगिता पाटील, प्रा. शशिकांत बांगर, प्रा. विजय भोर, प्रा. पियुष नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मालपाणी म्हणाले, संस्कृत शिक्षकांचा वर्णोच्चारातील बारकाव्यांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. जेणेकरुन संस्कृत वर्णांच्या अनुस्वार, विसर्गाच्या उच्चारातील बारकावे व भाषाविज्ञानाचे ज्ञान ते विद्यार्थ्यांना देवु शकतील. पाठांतराची शक्ती विद्यार्थीदशेतच तीव्र व अधिक असते तिचा योग्य वापर संस्कृत शिक्षकांनी करुन घ्यायला हवा. तसेच संस्कृत शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संपादक सदस्य डॉ. माधव भुस्कुटे यांनी कशा पध्दतीने संभाषणाभिमुख शिकवावे या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. सदर कृतिसत्रात ‘कृतिपत्रिका-अध्यापन प्रशिक्षणम्’ उपलब्ध करुन देण्यात आली. या कृतिसत्राला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला असून एकुण 50 प्रशिक्षणार्थी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे इशस्तवन भाग्यश्री पंडित यांनी केले. प्रास्ताविक व परिचय डॉ. अनिरुध्द मंडलिक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पियुषा नाईक यांनी केले तर आभार श्री. हिरे यांनी केले.