Breaking News

सटाण्याजवळ बसच्या अपघात 10 प्रवाशी जखमी

नाशिक, दि. 02 - विंचूर प्रकाशा महामार्गावरील सटाणा शहरानजीक असलोरेनगरजवळ आज सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास मालट्रक (क्रमांक एमएच 19जे  4523) आणि राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक अक्कलकुव्वा बसला (क्रमांक एमएच 20 बीएल 3024 अपघात झाला. अपघातात बसमधील दहा प्रवाशी जखमी  झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींवर सटाणा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते. नाशिकहून अक्कलकुव्वाकडे 58 प्रवाशी घेऊन बस सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास  निघाली होती. शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे बसमध्ये प्रवाश्यांची लक्षणीय गर्दी होती. अनेक प्रवाशी उभे राहूनच बसमध्ये प्रवास करत होते.
प्रवीण माधव (वय 12 रा.नाशिक) किसन वामन वाघ (वय 65 रा.नाशिक) भानुदास मोतीलाल सूर्यवंशी (वय 43 रा.ठाणे) दीपक केदारे(वय 25 रा.मांगीतुंगी)  अभिजित पिंपरे(वय 33, रा. नाशिक) चैत्राली पिंपरे(वय 29,रा. नाशिक) तर बसचालक संदीप जावरे अक्कलकुव्वा बसस्थानक जखमी आहेत.
देवळा स्थानकावरून सटाण्याकडे जात असतांना मालवाहतूक ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक झाली. ही घटना सटाण्याजवळ असलेल्या मोरेनगर भरधाव  जाणार्‍या दोन्ही वाहनांमुळे बसची चालकाकडचा भाग कापला गेला. या अपघातात चालकाच्या मागे बसलेले प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत तर इतर सात जणांना  किरकोळ दुखापत झाली आहे. सटाणा आगाराच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब सटाणा रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस करून मदत केली असल्याचे समजते.
अपघाताची बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरली. परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी धावून आले नंतर त्यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात  आले. तसेच बसमधील प्रवाश्यांना पुढील प्रवासासाठी दुसर्‍या बसच्या मदतीने पाठवण्यात आले.