Breaking News

जळगाव ते मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर; सप्टेंबरपासून सुरुवात

जळगाव, दि. 20, जुलै - डेक्कन चार्टर कंपनी जळगावातून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. सकाळी 11.50 व दुपारी  1.50 ला मुंबईकडे जाणारे विमान अवघ्या 90 मिनिटांत मुंबई गाठेल. केंद्र सरकारच्या ’उड्डाण’ योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जळगाव ते  मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमानसेवा दररोज असणार आहे. 72 आसनी ‘एटीआर -72’ विमान वापरले जाणार आहे. डेक्कन चार्टर जळगावसह,  नाशिक, पुणे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, आदी शहरांतून विमानसेवा सुरू करत आहे. त्याचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले. राज्यभरात दिवसभराच्या  वेळापत्रकात 12 फेर्‍या होणार आहेत.
मुंबई -जळगाव : सकाळी 10.05, 11.35; जळगाव -मुंबई : सकाळी 11.50, दुपारी 1.50