बार्टीद्वारे युवापिढीत आत्मविश्वास रुजवण्याचा प्रयत्न - महासंचालक ढाबरेंचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 24 - पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) माध्यमातून युवा पिढीमध्ये आत्मविश्वास रुजविण्याचा व समताधिष्ठीत समाज निर्मितीचा प्रयत्न असून, यासाठी विविध योजनांद्वारे युवापिढीला कौशल्य मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती महासंचालक सुरेश ढाबरे यांनी आज येथे दिली. बार्टीच्या मदतीने युवापिढीने विविध विषयांवर संशोधन करून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बार्टीद्वारे कुशल महाराष्ट्र मेळावा येथील न्यू आर्टस महाविद्यालयात नुकताच झाला. त्याचे उद्घाटन ढाबरे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी अभय महाजन, समाजकल्याण अधिकारी पांडुरंग वाबळे, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी उबाळे, उपप्राचार्य पंधरकर, जात प्रमाणपत्र समितीचे आयुक्त दाणे आदींसह अन्य यावेळी उपस्थित होते.
प्रत्येकाला नोकरीची आस असते, पण दिवसेंदिवस नोकर्यांचे प्रमाण कमी होत आहे. अशा स्थितीत युवापिढीमध्ये नैराश्य वाढू नये तसेच त्यांना रोजगार व स्वयंरोजगारासह उच्च शिक्षण, संशोधन संधी देण्याचा प्रयत्न बार्टीद्वारे होत असल्याचे सांगून ढाबरे म्हणाले, एम. फिल, पीएच. डी. संशोधन अर्थसहाय्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लॅपटॉप ट्रेनिंग, स्कील डेव्हलपिंग व अशा अन्य विविध उपक्रमांतून युवापिढीत स्वतः विषयीचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. गरीब, शोषित, मागास घटकातील विद्यार्थ्यांसह मध्यमवयीन व्यक्तींसाठीही योजना राबविल्या जातात. समाजातील प्रत्येक घटकाला तणावरहित जीवन जगण्याची संधी मिळण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी बार्टीची सदैव आवश्यक मदतीची तयारी असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी महाजन यांनीही बार्टीद्वारे राबवल्या जाणार्या योजनांना आवश्यक सहकार्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले. श्री. कापसे यांनी आभार मानले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितांच्या हस्ते प्रतिमेस फुले वाहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सर्व पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुमारे 300 ते 400 विद्यार्थी उपस्थित होते. बार्टीशी संलग्न तसेच स्वतंत्र उद्योजकताविषयक मार्गदर्शन करणार्यां व रोजगार उपलब्ध करून देणार्या विविध संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.