लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असल्यास शहरातील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार - डॉ. सुजय विखे
अहमदनगर, दि. 24 - शहरात विकास करण्यासाठी मोठी संधी आहे. निधी आनण्यास वेळ लागत नाही. तर लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असल्यास शहरातील उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम खोळंबल्याची खंत व्यक्त करुन, विकासात्म व सामाजिक प्रश्न सोडविण्यास युवकांना पुढे येण्याचे आवाहन युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी केले.
मराठी मीशनचे सिसल हॅण्डीक्रफ्ट सेंटरला युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी भेट देवून, युवकांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आशितोष आल्हाट, निखील वारे, स्वप्निल जायभाय, संतोष ससे, जग्गू शिंदे, यश शिंदे, आकाश आल्हाट, उदय आल्हाट, गोरक्ष बर्डे, अजय जायभाय, महेश पाखरे, संतोष फुलारे, अजय धोत्रे, राजेश कुलारे, हर्षल बाबर, राजू देठे, चेतन नाहटा आदि उपस्थित होते.पुढे विखे यांनी सामाजिक प्रश्न सोडविण्याची ताकत युवाशक्तीमध्ये असून, युवकांनी पुढाकार घेतल्यास विकासात्मक बदल घडणार असल्याचे सांगितले. उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश आनंदकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मराठी मीशनचे सिसल हॅण्डीक्रफ्ट सेंटरच्या वतीने चालू असलेल्या धार्मिक व सामाजिक कार्याची माहिती आशितोष आल्हाट यांनी देवून, विकासात्मक कार्यासाठी ख्रिस्ती युवकांचा पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू देठे यांनी केले.