Breaking News

सप्तश्रृंगी देवी मंदिर भाविकांसाठी खुले

नाशिक, दि. 29 - वणी येथील गडावरील सप्तश्रृंगी देवी मंदिर परिसरात सुरू असलेले संरक्षक जाळीवरील दरड काढण्याचे काम पूर्ण झाले असून सप्तशृंगी देवीचे  मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे कार्यकारी अभियंता, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवण यांनी कळविले  आहे.