लोणंदच्या सुपुत्राच्या कर्तृत्वाचा दिल्लीतही डंका
सातारा, दि. 05 - देशाचे सर्वोच्च स्थान असलेल्या राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावासमवेत लोणंदचे सुपुत्र व इंडियन बँकेचे प्रबंध निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर खरात यांच्या न कोनशिला बसवण्यात आली. निमित्त होते इंडियन बँकेच्या राष्ट्रपती भवन शाखेचे उद्घाटनाचे. त्यामुळे लोणंदच्या कार्यकर्तृत्वाचा डंका दिल्लीच्या तख्तावर किशोर खरात यांच्या रूपाने वाजला आहे.
लोणंदनगरीचे सुपुत्र किशोर खरात यांनी देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारण्याचे काम केले आहे. बँक ऑफ बडोदामधील साध्या लिपीकापासून आपली बँकींग क्षेत्रामधील कारकिर्द सुरु केल्यानंतर बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँकेच्या सीएमडी पदापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यानंतर किशोर खरात आता इंडियन बँकेचे प्रबंध निदेशक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये इंडियन बँकेच्या शाखेचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमिताने राष्ट्रपती भवनामध्ये बसवण्यात आलेल्या कोनशिलेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावाबरोबरच किशोर खरात यांच्या नावाची पाटी मोठ्या दिमाखात लागली आहे. यामुळे लोणंदच्या तरुणाच्या कार्यकर्तृत्वाचा डंका दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहचला असल्याची भावना लोणंद बरोबरच सातारा जिल्हावासीयामध्ये निर्माण झाली आहे. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये आता कायमस्वरूपी लोणंदच्या युवकाचे नाव राहणार आहे. राष्ट्रपती भवनामध्ये आपले नाव कोरण्याचे कर्तृत्व करणार्या किशोर खरात यांच्या बद्दल लोणंदवासीयामध्ये अभिमान व्यक्त केला जात असून त्यांचे मान्यवरांसह सर्वसामान्यांतून अभिनंदन करण्यात येत आहे.