Breaking News

जागतिक पातळीवरील सर्वाधिक बालकामगार भारतात

नवी दिल्ली, दि. 07 - जागतिक पातळीवर बालकामगारांचा आढावा घेतल्यास सर्वाधिक बालकामगार भारतात आहेत. जागतिक स्तरावर असलेल्या बालकामगारांसंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. 
भारतामध्ये सुमारे 48.2 दशलक्ष बालकामगार असून ही संख्या कोलंबिया देशाच्या एकूण जनगणनेएवढी आहे. यापैकी जागतिक पातळीवर सर्वाधिक म्हणजे सुमारे 31 दशलक्ष बालकामगार कारखान्यात काम करत असल्याचे आढळून आले आहे. बालविवाह, अकाली पालकत्व आणि शिक्षणाचा अभाव या गोष्टींमुळे बालकामगारांचे प्रमाण वाढते. जागतिक स्तरावरील 172 देशांच्या यादीत बालकामगारांसदर्भात भारताचा 116 वा क्रमांक लागतो, असे या अहवालात म्हटले आहे. भारताच्या शेजारी असलेल्या श्रीलंकेचा या यादीत 61, भुतान 93 आणि म्यानमारचा 112 क्रमांक लागत असून नेपाळ (134), बांगलादेश (134) आणि पाकिस्तानमधील (148) परिस्थिती भारतापेक्षा अत्यंत हलाखीची असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. जीवनाच्या या टप्प्यावर येणार तीव्र कुपोषणामुळे या परिस्थितीत मुख्यत्वे परिवर्तन होत नाही. मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना काम करावे लागते. त्यामुळे त्यांना आजार किंवा असाध्य रोग जडतात आणि परिणामी त्यांच्या मृत्यूची शक्यता वाढते, असेही या अहवालात म्हटले आहे.