500 गावे अनिवासी भारतीय दत्तक घेणार
नवी दिल्ली, दि. 07 - देशातील ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय भारतातील 500 गावे दत्तक घेणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत घोषणा एक जुलै रोजी सिलिकॉन व्हॅली येथे बिग आयडियाज फॉर बेटर इंडिया संमे लनामध्ये करण्यात येणार आहे. या संमे लनात आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचे व्याख्यान होणार आहे . . या कार्यक्रमात एक हजारहून अधिक अनिवासी भारतीय उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण यामुळे ग्रामीण विकासासाठी 500 गावे निवडण्यात आली असून ती दत्तक घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ’बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया’ कार्यक्रमाचे अध्यक्ष सतेज चौधरी यांनी दिली.