Breaking News

कपिल मिश्रांची ‘आप’च्या तीन आमदारांविरोधात तक्रार दाखल

नवी दिल्ली, दि. 04 - दिल्ली सरकारमधून हकालपट्टी करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांविरोधात  हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली. अमानतुल्ला,ल आणि जरनॅल सिंग या तिघांविरोधात मिश्रा यांनी सिव्हिल लायन्स पोलीस ठाण्यात तक्रार  दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. 
30 मे रोजी विधानसभा सभागृहात मिश्रा यांना मारहाण करण्यात आली होती. मार्शलच्या मदतीने मिश्रा यांना सभागृहाच्या बाहेरही काढण्यात आले होते. दिल्लीचे  उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सांगण्यावरून मारहाण करण्यात आल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा यांनी या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांना  दिल्याचे समजते.