Breaking News

देशांतर्गत सुरक्षेची स्थिती सुधारली - राजनाथ सिंग

नवी दिल्ली, दि. 04 - देशात सुरक्षेसंदर्भातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली. काही दहशतवादी संघटनांचे जाळे  उद्धवस्त करण्यात यश आले आहे. सरकारने इसिस या दहशतवादी संघटनेला भारतात शिरकाव करू दिला नाही. गेल्या तीन वर्षांत 90 हून अधिक पाकिस्तानी  गुप्तचर संघटनेच्या समर्थकांना अटक करण्यात आली आहे. देशात मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असूनही इसिसने भारतात शिरकाव केलेला नाही, अशी  माहितीही सिंग यांनी यावेळी दिली.
सध्या काश्मीरमधील स्थिती नियंणात आली आहे. तसेच नक्षलवादी समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार नवी योजना आखत आहे. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या  कार्यकाळात नक्षलवादी हल्ले 25 टक्क्यांहून अधिक कमी झाले आहेत. नक्षलवादी भागात 307 नवीन पोलीस ठाणे बनवण्यात आल्याचेही सिंग यांनी सांगितले.