सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची हत्या करणे चुकीचे - श्री.श्री.रविशंकर
नवी दिल्ली, दि. 04 - प्रत्येकाला आपला आहार ठरवण्याचा अधिकार असतो हे खरे असले तरी सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची हत्या करणे चुकीचे असल्याचे अध्यात्मिक गुरू श्री.श्री.रविशंकर यांनी म्हटले आहे. देशातील पशुंच्या संख्येत घट होत असल्याने त्यांच्या हत्येवर बंदी घालण्याच्या निर्णयाला आपण पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले.
देशातील पशूंच्या संख्येत घट होत आहे. या मुद्द्याकडे गांभिर्याने त्यावर तोडगा काढणे सरकारसाठी अनिवार्य आहे. तामिळनाडूमध्ये पूर्वी पशूंची संख्या 85 टक्के इतकी होती. मात्र, आता त्यात मोठी घट झाल्याचे दिसते, असे त्यांनी सांगितले. क्यूबा सारख्या देशांमध्येही प्राण्यांची हत्या करणा-यांना दंडात्मक शिक्षा दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.