Breaking News

केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यू बाबत काढलेला निष्कर्ष एकतर्फी - ममता

कोलकाता, दि. 03 - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातातच मृत्यू झाला ही केंद्र सरकारने दिलेली माहिती धक्कादायक आहे. केंद्र सरकारचा हा निष्कर्ष एकतर्फी आहे, असे प्रतिपादन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. 
त्या म्हणाल्या की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत दिलेली माहिती एकतर्फी असून याबाबत केंद्र सरकारकडे कोणतेही पुरावे नाहीत. ही माहिती ऐकून मला आश्‍चर्य वाटले आहे. सुभाषचंद्र बोस यांचा संपूर्ण देशाला आणि जगाला अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भातील अशी कोणतीही माहिती सरकारने अशी सादर करायला नको होती, असे त्यांनी नमूद केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र नेताजींचे पणतू आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्र बोस यांनी केंद्राचा दावा फेटाळला आहे.