Breaking News

चांगला पाऊस पडण्यासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडून कृष्णानदीची सपत्नीक पूजा

महाबळेश्‍वर, दि. 03 - महाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पाच नद्यांचे उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे कर्नाटक शासनाच्या वतीने कर्नाटकात  आलेली दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी व पाऊस चांगला पडावा, या उद्देशाने कर्नाटकवासियांच्या वतीने कर्नाटक शासनाने कृष्णानदीची जलसंपदा मंत्री एम.बी.  पाटील यांनी सपत्नीक पूजा करण्यात आली.
महाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पाच नद्यांचा उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्रमहाबळेश्‍वर येथील कृष्णा ही मुख्य नदी असून ती महाराष्ट्र,कर्नाटक व आंध्रचा काही  भागातून जाते.या तीनही राज्याची कृष्णा नदी ही जीवनवाहिनी आहे.गेल्या दहा पंधरा वर्षात कृष्णा नदीतून वाहणारे पाणी महाबळेश्‍वर परिसरात पडणार्‍या पावसावर  अवलंबून असते नेहमी कमी जास्त होणार्‍या पावसामुळे महाराष्ट्र सह कर्नाटक मध्ये अनेक वेळा दुष्काळी परिस्थिती उद्भवते.कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्याने  कर्नाटकच्या शेतकर्‍यांच्या जीवनमानावर मोठा परिणाम पडला असून अनेकवेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळी परिस्थिती दूर होऊन राज्य दुष्काळ  मुक्त व्हावे या उद्देशाने कर्नाटकवासियांच्या वतीने शासनाने शुक्रवारी सकाळी श्री क्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरामध्ये फुलांनी आकर्षक व नयनरम्य सजावट केली होती या  ठिकाणी उमा महेश्‍वर व महालक्ष्मी ची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली तसेच कृष्णानदीचे उगमस्थान असलेल्या पंचगंगा मंदिरामध्ये वैदिक पद्धतीने पूजा  कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.कर्नाटक येथील विविध भागांतील वेदशास्त्रीनी या पूजेचे पौराहित्य केले.एम बी पाटील  यांनी पुरातन कृष्णादेवी मंदिराची पाहणी केली.
या पूजेस कर्नाटकातील चिकोडी चे खासदार प्रकाश हुक्कीरे,चिकोडीचे आमदार गणेश हुक्कीरे,जमखंडीचे आमदार सिद्धू न्यामगौडा,कर्नाटक शासनाचे जलसंपदा विभागाचे  प्रधान सचिव राकेश सिंग,उपसचिव अनिल कुमार,व्यवस्थापक निर्देशक मल्लिकार्जुन गुंगे,कर्नाटक निरावरी निगम चे मुख्य अभियंता के एफ हुलकुंद तसेच कृष्णा भाग्य  जलनिगम तसेच शासनाचे अधिकारी व क्षेत्र महाबळेश्‍वरच्या सरपंच सारिका पुजारी, उपसरपंच प्रदीप कात्रट, राजू पुजारी, जीवन महाबळेश्‍वरकर, नाना वाडेकर, सुहास  महाबळेश्‍वरकर, जितेंद्र जाधव, अनिल जाधव, राजेंद्र मोरे, प्रशांत कात्रट आदी उपस्थति होते.