ऑस्ट्रेलिया एकही सामना न खेळता चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर!
बर्मिंगहॅम, दि. 10 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत गेल्या दोन सामन्यांमध्ये पावसाचा फटका झेलणार्या ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने या आधीच जागा मिळवली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो असणार आहे. ऑस्ट्रेलियाचे न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्धचे सामने पावसामुळे रद्द करावे लागले. त्यामुळे दोन्हीही सामन्यांमध्ये समान गुण देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या नावार सध्या केवळ दोन गुण आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची लढत महत्वपूर्ण असणार आहे.
एजबॅस्टनमध्ये खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांना पावसाचा फटका बसला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. तर भारत-पाकिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात षटकांची संख्या कमी करावी लागली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सरावाची फारशी संधी मिळालेली नाही आणि त्यातच आता त्यांची गाठ बलाढ्य इंग्लंडशी होणार आहे. डेव्हिड वार्नर, अरॉन फिंच आणि स्टीव्हन स्मिथ या फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
गेल्या सामन्यातील गोलंदाजीतून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलिया करणार आहे. ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 182 धावांवर बाद केलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला.