Breaking News

एअर इंडियाच्या विमानांमध्ये आता व्यावसायिक वर्गासाठी तीन रांगा आरक्षित राहणार

नवी दिल्ली, दि. 03 - एअर इंडियाच्या सर्व सामान्य वर्ग असलेल्या विमानांमध्ये व्यावसायिक वर्गासाठी तीन रांगा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि बीजू जनता दलाचे नेते अर्जुन चरण सेठी यांचे प्रकरण झाल्यानंतर एअर इंडियाकडून हा निर्णय घेण्यात आला.
याअंतर्गत सामान्य वर्ग असलेल्या विमानांमधील पहिल्या तीन रांगा व्यावसायिक वर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मधील रांग रिकामी ठेवण्यात येणार आहे. या रिकामी रांगेनंतर मग ,सामान्य वर्गाची रांग सुरू होणार आहे. हे दोन्ही वर्ग वेगळे करण्यासाठी मध्ये पडदा टाकण्यात येणार आहे.अशाप्रकारे आता एअर इंडियाच्या सर्व विमानांमध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे.