पाकिस्तानवर अण्वस्त्र हल्ला करा - विहिंप
नवी दिल्ली, दि. 03 - पाकिस्तानवर अण्वस्त्र हल्ला करा, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे नेते आचार्य धर्मेंद्र यांनी केले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार सीमे रेषेवर शस्त्रसंधीचेउल्लंघन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आचार्य धर्मेंद्र राजस्थानमधील कोटा शहरात बोलत होते. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानवर अण्वस्त्र हल्ला करणे गरजेचे आहे. पाकिस्तानला शेजारी देश असे न म्हणता शत्रू राष्ट्र म्हणून संबोधित केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याऐवजी तिला राष्ट्रीय माता म्हणूनकरा. तसेच मुस्लिम समाजाने वंदे मातरम म्हणावे, असा सल्लाही धर्मेंद्र यांनी दिला.
गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याऐवजी तिला राष्ट्रीय माता म्हणूनकरा. तसेच मुस्लिम समाजाने वंदे मातरम म्हणावे, असा सल्लाही धर्मेंद्र यांनी दिला.