नैसर्गिक द्रवरूप वायू निर्यातीसाठी अमेरिकेची मंजुरी
वॉशिंग्टन, दि. 03 - नैसर्गिक द्रवरूप वायूच्या निर्यातीच्या दीर्घकालीन प्रक्रियेसाठी अमेरिकेने मंजुरी दिली आहे. ही योजना मेक्सिकोच्या खाडीत भारत व अमेरिकेच्या प्रत्येकी एका कंपनीचा संयुक्त उपक्रम आहे.
डेलफिन नैसर्गिक द्रवरूप वायूच्या प्रस्तावित लुइसियाना तरंगत्या टर्मिनलमधून 1.8 अब्ज घनफूट दररोज नैसर्गिक वायू निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे, असे अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने सांगितले. या मंजुरीनंतर अमेरिकेची एक मजबूत ऊर्जा शक्ती कायम राहील, असे अमेरिकेच्या ऊर्जा मंत्री रिक पेरी यांनी सांगितले.