Breaking News

आडोशी ते खंडाळा बोगद्यादरम्यान वाहतूक ठप्प

पुणे, दि. 28 - आडोशी बोगद्याजवळ पावसामुळे दरड कोसळण्याची भीती असल्याने सैल झालेले दगड काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे आडोशी ते खंडाळा  बोगद्यादरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे.आज साडेबारा वाजल्यापासून दगड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही काळासाठी एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक  ठप्प झाल्याने प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. द्रुतगती मार्गावरील कामाचा पहिला ब्लॉक संपला आहे. दुसर्‍या ब्लॉकला दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली  जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आज या मार्गावर वाहतूक कोंडीचा पुन्हा सामना करावा लागणार आहे.