Breaking News

काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश

सांगली, दि. 21 - वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील 248 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या कुटुंबियांच्या नावावरील  दहा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. वसंतदादा बँकेतील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांनी हे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संबंधित वारसदारांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. यात मदन पाटील  यांच्या पत्नी आणि दोन मुलीच्या नांवावरील मालमत्तेचा समावेश आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणार्‍या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील  तत्कालिन संचालक, अधिकार्‍यांनी नियमबाह्य व विनतारण कर्जवाटप केलं होता. यातील 300 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्जवाटप प्रकरणावर आक्षेप नोंदविण्यात  आला होता.  आता याप्रकरणी तपास अधिकार्‍यांनी मालमत्ता जप्तीचे आदेश दिले असून, यात कवलापूर, पद्माळे आणि सांगलीतील दहा मालमत्तांचा यामध्ये समावेश  आहे.