फिलिपिन्समधील कॅसिनोत दहशतवादी हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी
मनिला, दि. 03 - फिलिपिन्समधील मनिला येथे एका कॅसिनोमध्ये झालेल्या गोळीबारात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेनी स्वीकारली आहे. काल (1 जून) एक अज्ञात हल्लेखोराने कॅसिनोमध्ये प्रवेश करत गोळीबार सुरु केला. त्यानंतर कॅसिनोमध्ये एकच खळबळ माजल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोराकडून बंदूक आणि मशीन गन जप्त केली आहे.
यावेळी हल्लेखोर ठार झाला असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींवर गोळ्या झाडण्यात आून चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता एका वरिष्ठ अधिका-याने वर्तविली आहे.
यावेळी हल्लेखोर ठार झाला असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहे. हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींवर गोळ्या झाडण्यात आून चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता एका वरिष्ठ अधिका-याने वर्तविली आहे.